शिवप्रहार न्युज - अन्नातून विष देत उपजिल्हाधिकारीच्या जिवावर उठली त्याचीच बायको…

अन्नातून विष देत उपजिल्हाधिकारीच्या जिवावर उठली त्याचीच बायको…
संभाजीनगर- याबाबत अधिक माहिती अशी, आपल्या नगर जिल्हयावा लागून असेलेल्या संभाजीनगर जिल्ह्यात देवेंद्र कटके हे निवडणूक उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत. मात्र देवेंद्र कटके यांना त्यांच्या सारिका नामक पत्नीनेच मित्राच्या मदतीने जीवनातून संपविण्याचा डाव आखल्याचा अतिषय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या घटनेने जिल्ह्यातील प्रशासन व अधिकारी वर्ग हादरून गेले आहे.
यासाठी कटके यांच्या पत्नीने आई, भाऊ, मित्र आणि घरातील मोलकरीण यांच्यासोबत एकत्र येत,कट रचून,अन्नातून विषप्रयोग केल्याचे समोर आले आहे. तसेच या सर्वांनी कट रचून देवेंद्र कटके यांच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग केले. त्यांना जेवणातून विषबाधा करून मारण्याचा कट रचला. घरात देवेंद्र यांच्या गादीखाली काळे झालेले लिंबू, सुई टोचलेली बाहुली आढळली.तसेच फुलदाणीत बिबे, स्मशानातील राख, कोळसा, लवंगांची माळ, शेंदूर असे साहित्य दिसून आले.
दरम्यान याप्रकरणी पत्नी सारिका हिच्या उबाळे नावाच्या मित्रासह एकुण ०६ जणांवर संभाजीनगर च्या सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.विवाहबाह्य संबंधातून हि घटना घडल्याचे समजते.