शिवप्रहार न्युज - गलथान कारभारामुळे बेलापूर पंचक्रोशीची "महाशिवरात्रीची रात्र" अंघारात...

गलथान कारभारामुळे बेलापूर पंचक्रोशीची "महाशिवरात्रीची रात्र" अंघारात...
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक पंचक्रोशीतील वळदगाव,उंबरगाव,ऐनतपूर व इतर भागांमध्ये काल महाशिवरात्री या हिंदूंच्या सणाच्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेकांची महाशिवरात्रीची रात्र ही अंधारात गेली.
काल हिंदुंच्या सणासुदीच्या दिवशी लाईट गेली असून आज गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत लाईट आलेली नव्हती.हिंदुंच्या सणाच्या दिवशी लाईट न देवू शकणारी महावितरण चा या भागातील हिंदू बांधवांनी निषेध केला आहे.