शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातून पळालेला आरोपी धरला ….

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातून पळालेला आरोपी धरला ….

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातून पळालेला आरोपी धरला ….

श्रीरामपूर - जिम मधील मुलांना अमली पदार्थ नशा इंजेक्शन विक्री प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये ताब्यात घेऊन आणलेला आरोपी जावेद सिराज शेख,रा.लोणी,ता.राहता हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हातकडीसह मंगळवारी पळून गेला होता.श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ०५ पथकांकडून त्याचा अतिशय कसून,जोरदार शोध चालू होता.

       दरम्यान आरोपी जावेद शेख हा श्रीरामपूर शहर पोलिसांना पुन्हा मिळाला असून त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढील कारवाई शहर पोलीस करत आहेत.