शिवप्रहार न्युज - नगर-मनमाड हायवे परिसरात तरुणाने स्वतःच्या डोक्यात मारली गोळी…

शिवप्रहार न्युज -  नगर-मनमाड हायवे परिसरात तरुणाने स्वतःच्या डोक्यात मारली गोळी…

नगर-मनमाड हायवे परिसरात तरुणाने स्वतःच्या डोक्यात मारली गोळी…

 राहुरी - राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड हायवे वर असलेल्या चिंचोली 

-गुहा शिवारामध्ये कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील एका तरुणाने त्याच्याकडील गावठी कट्ट्याने स्वत:च्या डोक्यात गोळी मारल्याची घटना घडली आहे.

       याबाबत अधिक माहिती अशी की,आज महाशिवरात्रीच्या दिवशी दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी कोपरगाव येथून हा तरुण चिंचोली फाटा परिसरात आला होता. या भागातील एका मुलीसोबत त्याचे प्रेम विवाह माध्यमातून लग्न झाले होते.परंतु मुलीच्या घरच्यांनाही लग्न मान्य नव्हते.त्यांनी त्याला सांगितले की,तुमचे थाटामाटात लग्न लावून देऊ आणि मुलीला ते त्याच्यापासून घेऊन गेले व नातेवाईकांकडे ठेवली.त्याचा त्यानंतर मुलीशी संपर्क झाला नाही.म्हणुन राग आल्याने व तिला पुन्हा स्वतःच्या घरी त्याला न्यायची असल्याने तो चिंचोली फाटा परिसरात आला. यावेळी त्याच्या हातात गावठी कट्टा होता.त्याच्यासमोर लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने त्याने कट्ट्यातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली.

        यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला सुरुवातीला लोणी व नंतर ससून,पुणे येथे दाखल केले असल्याचे समजते.दरम्यान राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.

या घटनेची परिसरात मोठी चर्चा चालू आहे.