शिवप्रहार न्युज - विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने केला शिक्षिकेचा विनयभंग; खळबळ...

शिवप्रहार न्युज -  विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने केला शिक्षिकेचा विनयभंग; खळबळ...

विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने केला शिक्षिकेचा विनयभंग; खळबळ...

  संगमनेर (शिवप्रहार न्युज)- संगमनेरच्या मालदाड परिसरातील श्रम शक्ती माध्यमिक विद्यालयात सकाळी ८ - ३० च्या सुमारास एक शिक्षिका स्टेजवर खुर्चीवर बसलेलेली असतांना या शिक्षण संस्थेत नोकरीस असलेला शिक्षक दत्तु किसन कौटे रा . फ्लोराटाऊन सोसायटी,संगमनेर हा शिक्षिकेजवळ गेला व तिला म्हणाला की, तु किती नालायक आहे हे मला माहीत आहे असे म्हणून शिक्षिकेचा हात धरून ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. 

      शिक्षक दत्तु याने मुला - मुलींसमोर हा प्रकार केला. शिक्षिकेने प्रतिकार करताच शिक्षक दत्तु कौटे याने शिक्षकेला कानाखाली चापट मारली. या प्रकाराने विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

      पिडीत शिक्षिकेच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तु कौटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिंता 2023 चे कलम 74, 115 (z), 352 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून पोनि.ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ.जायभाये हे पुढील तपास करीत आहेत. 

       या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.संस्थाचालक शिक्षकावर काय कारवाई करतात ? याकडेही पालक व नागरीकांचे लक्ष लागले आहे.