शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहरातील वैभव हॉटेल येथे लागली आग…

श्रीरामपूर शहरातील वैभव हॉटेल येथे लागली आग…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वैभव हॉटेल ह्या हॉटेलला चिटकून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आज बुधवारी दुपारी साडेबारा-एक वाजताच्या दरम्यान आग लागण्याची घटना घडली.ही आग सिलेंडरमुळे लागल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणने आहे.
दरम्यान या ठिकाणी आग लागतात नगरपालिकेच्या ०२ अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आगीने मोठे रूप धारण केले नाही.अग्निशमन यंत्रणेने आग तात्काळ विझवली.बघ्यांची गर्दी निर्माण झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.