शिवप्रहार न्युज - ग्रामसभेत रजिस्टर फाडून महिला सरपंचाला धमकी;श्रीरामपूर तालुक्यातील घटना…

ग्रामसभेत रजिस्टर फाडून महिला सरपंचाला धमकी;श्रीरामपूर तालुक्यातील घटना…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावात काल ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा सुरु असताना गावातीलच एकाने रजिस्टर फाडून महिला सरपंचाला धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की रविवार दि. २६ जानेवारी रोजी झेंडावंदनानंतर सकाळी १० वाजता एकलहरे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत गावातील नसीर सलीम शेख याने येवून ग्रामसभेची कार्यवाही कधी सुरु करणार असे विचारले. तेंव्हा ग्रामपंचायत अधिकारी सलीम मनियार यांनी कोरम पूर्ण होऊ द्या असे सांगितले.तेंव्हा नसीर शेख याने ग्रामसभेचे उपस्थिती रजिस्टर घेऊन सही केली. त्यानंतर रजिस्टरचे फोटो घेत असताना त्याला ग्रामपंचायत अधिकारी मनियार यांनी इतर ग्रामस्थांच्या सह्या होऊ द्या असे सांगितले तरीही नसीर हा रजिस्टर घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर जाऊ लागला तेंव्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी त्याला आडवले असता त्याने त्यांना जोराचा धक्का देवून रजिस्टर फाडले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर अधिकारी समीर मनियार यांना "तुम गाव मे से निकल जाओ, वापस इदर दिखोगे तो तुम्हे जानसे मारडालुंगा' अशी धमी देवून शिवीगाळ केली.तसेच सरपंच रिजवाना शेख यांना तुमने मेरे उपर केस किया, अब मै तुम लोगो को दिखाता हूँ, अशी धमकी दिली. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी सलीम मनियार रा. फातेमा हौसिंग सोसायटी, वॉर्ड नं. १, श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन सरकारी कामात अडथळा आणून धमकी देणारा नसीर सलीम शेख रा. एकलहरे, ता. श्रीरामपूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो. अमलदार हापसे हे करीत आहे.