शिवप्रहार न्यूज- दारूच्या व्यसनामुळे श्रीरामपूरच्या विनोदचा नाशिक येथे उपचार घेत असताना मृत्यू…

दारूच्या व्यसनामुळे श्रीरामपूरच्या विनोदचा नाशिक येथे उपचार घेत असताना मृत्यू…
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील ब्राह्मणगाव वेताळ या गावामध्ये राहणारा तरुण विनोद कचरू निकम,वय 35 वर्ष याला दारूचे प्रचंड व्यसन असल्यामुळे सिविल हॉस्पिटल, नाशिक येथे उपचार कामी दाखल करण्यात आले होते.परंतु दारूच्या व्यसनामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सिव्हिल हॉस्पिटल,नाशिक च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात कागदपत्र उशीराने दाखल झाल्यानंतर काल रोजी अपमृत्यु क्रमांक 120/2021 सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार परदेशी हे करीत आहेत.