शिवप्रहार न्युज - माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची दिवाळी जेलमध्येच…

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची दिवाळी जेलमध्येच…
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार व अशोक कारखान्याचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे हे सध्या महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे.दरम्यान आज त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती.परंतु सुनावणी होऊ न शकल्याने दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी पुढील तारीख देण्यात आली आहे असे समजते.
यामुळे ०१ नोव्हेंबर रोजी असणारी दिवाळी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना जेलमध्येच काढावी लागणार असल्याचे दिसत आहे.तरी जामीन मिळण्यासाठी मुरकुटे यांचे जोरदार प्रयत्न चालू आहे.