शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात स्विफ्ट कारने घेतला अचानक पेट…

श्रीरामपुरात स्विफ्ट कारने घेतला अचानक पेट…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरातील बस स्टँड जवळील हॉटेल राधिकासमोर आज शनिवारी दुपारी स्विफ्ट (Mh 12 FU 5930) ह्या कारने अचानक पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांमघ्ये गोंधळ उडाला होता. आग विझवण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्नीशमन बंब पाचारण करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित नागरिकांनीही पेटलेली कार विझवण्यासाठी मदत केली. या पेटलेल्या कारमुळे मोठ्या प्रमाणात धूर आसपास पसरला होता.हा प्रकार पहाण्यासाठी रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.