शिवप्रहार न्युज - मध्यप्रदेश पासिंगचा धान्याचा ट्रक पलटी...

मध्यप्रदेश पासिंगचा धान्याचा ट्रक पलटी...
नेवासा - नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम पुलाच्याजवळ कायगाव हद्दीत आज रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळच्या सुमारास एक मध्यप्रदेश पासिंगचा धान्याचा ट्रक पलटी झालेल्या अवस्थेत आढळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की,या ठिकाणी रस्त्याचे काम चालू असल्याने एकाच लेनवर दोन्हीही साईटची वाहतूक चालू आहे.त्यामुळे उद्भवलेल्या गोंधळामुळे हा ट्रक पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.दरम्यान प्रशासन अद्यापपर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते.