शिवप्रहार न्युज - रात्री पाणी भरण्यासाठी गेलेला शेतकरी बांधव बेपत्ता…

शिवप्रहार न्युज -  रात्री पाणी भरण्यासाठी गेलेला शेतकरी बांधव बेपत्ता…

रात्री पाणी भरण्यासाठी गेलेला शेतकरी बांधव बेपत्ता…

श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथील संजय काशिनाथ ठाकर हे बेपत्ता झाल्याने गुजरवाडीसह खिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी की, संजय ठाकर हे त्यांच्या गव्हाला पाणी भरण्यासाठी शुक्रवारी रात्री अकरा वाजता गेले होते. त्यानंतर ते जेवण करण्यासाठी घरी आले व पुन्हा एक वाजेच्या दरम्यान ते घराबाहेर पडले.त्यानंतर मात्र ते पुन्हा घरी आलेच नाही अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. सकाळच्या दरम्यान त्यांचा मुलगा सागर याला गुजरवाडी कारेगावरोडवरील ग्रामपंचायतच्या विहिरीजवळ त्याच्या वडिलांची गाडी पडलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी तालुका पोलीस स्टेशनला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. 

         यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रॉबिन बंन्सल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर गायब झालेल्या इसमाचा परिसरातील पूर्ण शेतांमध्ये तसेच विहिरीमध्येही शोध घेतला. यावेळी डॅागस्कॅाड आले होते.परंतू सदर व्यक्ती कोठेही आढळून आली नाही.याप्रकरणी अलका संजय ठाकर यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

      तरी बातमीतील फोटोमध्ये दिसणारे व बेपत्ता झालेले संजय काशिनाथ ठाकर हे कोणाला मिळून आल्यास त्यांनी तात्काळ पोलीसांसोबत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.